Thursday, 19 January 2012

गीत तेरे साज का तेरी ही आवाज हूँ Geet Tere saaj ka teri hi awaz hun





आलापाच्या प्रतिध्वनिसोबत आकाशाकडे तोंड असलेल्या गोल फिरणार्‍या कॅमेर्‍यात वृक्ष दिसतात. ती गोल फिरतात असे वाटते. मग ढग आणि त्यांच्या आडून सूर्य. मग खळखळणारे, वाहते पाणी. घुमणार्‍या आवाजाला या दृश्यांमुळे व्यापकता लाभते. त्यानंतर व्हायोलिनचे कोरस आणि त्यावर जीपमधून संजय खान एका ब्रिजवर येतो आणि ब्रिजच्या मधोमध थांबतो. त्याला जणून सर्वदूर घुमणारा हा आवाज ऐकू येतो आणि म्हणून तो थांबतो. आवाजाचा वेध घेत मग संजय खान इकडे तिकडे पाहतो. दूर एका बोटीतून पांढरे कपडे घातलेली एक स्त्री त्याला दिसते. ती हे गाणे गात आहे. त्यानंतर तो आवाजाचा वेध घेत त्या स्त्रीचा पाठलाग करतो मात्र संपूर्ण गाण्यात त्यांच्यातले अंतर तितकेच राहते. यासाठी तो नेहमी मिड क्लोज अप किंवा क्लोज अप मध्ये दाखवला आहे आणि ती खूप लांबवर खूप मोठ्या फोरग्राउंडिंगमध्ये दाखवली आहे. कधी डोंगराच्या अगदी वरती, कधी विस्तीर्ण शेतात, कधी मोठ्या नदीच्या पात्रात एका छोटाशा बोटीत. या गाण्यात साधना ज्या पद्धतीने चालते ती मात्र या गाण्याच्या सूर, तालाशी सुसंगत नाही. तालाची गती, एकूण गाण्याचा बाज यांच्याशी तिचे चालणे मेळ खात नाही. ती फार लौकर चालते किंवा काहीच हालचाल करत नाही. ती स्पष्ट दिसतही नाही त्यामुळे हे गाणे संपूर्णपणे संजय खानचे, लता मंगेशकरचे आणि दिग्दर्शकाचे आहे. 


चित्रपट इंतेकाम, वर्ष 1969, दिग्दर्शक आर के नय्यर, संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल

No comments:

Post a Comment