एखाद्या गाण्याचा मूड कसा तयार होतो? या गाण्यात ‘जाण्याचा’ मूड खूप प्रभावीपणे तयार केला गेला आहे. येथे ‘दिलदार’ला आव्हान केले आहे. एकीकडे रोमँटिक आणि दुसरीकडे अतिशय फिलॉसॉफिकल असा मूड या गाण्यात तयार होतो. प्रतिध्वनी वापरल्याने गाणे घुमत राहते. घुंगरूंचा ठेका धरल्याने सतत चालण्याचा आभास होतो. हा ठेका हळूहळू गतीमान होतो. संपूर्ण गाण्याच्या चित्रीकरणात पात्रे केवळ आवाजरूपाने वावरतात. दोनच लहान शॉटमध्ये राजकुमार आणि मीनाकुमारी (असे सांगतात की या गाण्याचे शूटिंग झाले तोवर कमाल अमरोही आणि मीना कुमारी एकमेकांशी बोलतही नव्हते त्यामुळे संपूर्ण गाणे मीना कुमारीविनाच शूट करण्यात आले) एकत्र दिसतात. तेही लाँग शॉटमधे. एका शिडाची एक बोट हेच जणू या गाण्यातील मुख्य पात्र आहे. त्या बोटीचा, पाण्याशी, चंद्राशी आणि तार्यांशी चाललेला संवाद हा गाण्यातून प्रकट होतो. चित्रीकरणाची ट्रीटमेंट गाण्याच्या बोलांशी एकरूप होण्यास मदत करते. गाण्यात वापरलेला मोहम्मद आणि लता मंगेशकर यांचा आलाप अनेक भावांतून जातो. ती हाक आहे, की आनंद व्यक्त झाला आहे, की शेवटचा श्वास आहे?
No comments:
Post a Comment