Saturday, 18 February 2012

हमने देखी है उन आँखों की महकती खुशबू Humne dekhi hai un ankhon ki


हमने देखी है उन आँखों की महकती खुशबू, हाथ से छू के इसे रिश्तों का इल्जाम ना दो
सिर्फ एहसास है ये, रूह से मेहसूस करो, प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम ना दो ॥
प्यार कोई बोल नहीं, प्यार आवाज नहीं, एक खामोशी है, सुनती है कहा करती है
न यह बुझती है, ना रुकती है, ना ठहरी है कहीं, नूर की बूँद है, सदियों से बहा करती है ॥1॥
मुस्कुराहट से खिली रहती है, आँखों में कहीं, और पलकों पे उजाले से रुके रहते हैं,
होंठ कुछ केहते नहीं, काँपते होठों पे मगर, कितने खामोश से अफसाने रुके रहते हैं॥2॥


गुलजारचे वरील गीतातील शब्द आणि खाली दिलेल्या गीताचे शब्द त्यांची शैली आणि चिन्हप्रयोगांबाबत खूप माहिती देतात. हमने देखी (पाहणे) है उन आंखों की महकती खुशबू (वास घेणे) – कर्मेंद्रियांना वेगळाच अर्थ येथे प्राप्त होतो. खुशबू ‘पाहणे’? प्यार बोल नहीं म्हणजे नि:शब्द आहे, आवाज नहीं मात्र एक खामोशी है जो सुनती है आणि कहा करती है. न बुझती है, रुकती है, ना ठहरी है कहीं और बहा करती है तरी ही प्यार एक बूँद है नूर की – नूर म्हणजे दवबिंदू.

हे गाणं दोन भागात आहे. पहिल्या भागात वहिदा रेहमान आणि राजेश खन्ना आहेत आणि ते एका इस्पितळात आहेत. गाणं एका रेकॉर्डरवर ऐकले जाते आहे आणि त्या दोघांवर त्या गाण्याचा परिणाम होतो आहे. त्यातच वहिदा रेहमानला गाण्याचा परिणाम राजेश खन्नावर काय होतो हे पाहायचे आहे. गाणे पहिल्या कडव्यानंतर थांबते आणि रेकॉर्डचे खरखर सुरू होते. त्यावरून मग आपण एका स्टुडियोत जातो जेथे दुसरे एक स्त्री पात्र तेच गाणं रेकॉर्ड करते आहे. या गाण्यात कृष्ण धवल रंगांचा आणि लायटिंगचा उपयोग पाहण्यासारखा आहे. त्याचबरोबर कॅमेरा दोन्ही भागात ज्या प्रकारे वापरला आहे ते अभ्यासण्याजोगे आहे. पहिल्या भागात कॅमेरा खालून वरती पाहतो किंवा आपल्या नजरेला समांतर पाहतो. दुसर्‍या भागात कॅमेरा पात्राकडे वरून पाहतो. त्यामुळे दोन वेगळे डायजेसिक निर्माण होतात.

सुरमई शाम इस तरह आये, साँस लेते हैं, जिस तरह साये

कोइ आहट नहीं, बदन की कहीं, फिर भी लगता है, तू यही है कहीं,
वक्त जाता सुनाई देता है, तेरा साया दिखाई देता है
जैसे खुशबू नजर से छू जाए

दिन का जो भी पहर गुजरता है, कोइ एहसान सा उतरता है,
वक्त के पाँव देखता हूँ मैं, रोज ये छाँव देखता हूँ मैं
आये जैसे कोई ख़याल आये
चित्रपट खामोशी, वर्ष 1969, दिग्दर्शक असित सेन, संगीत हेमंत कुमार, गीतकार गुलजार

Sunday, 12 February 2012

जन-गण-मन अधिनायक, जय हे Jana Gana Mana Adhinayak


जन-गण-मन अधिनायक, जय हे
भारत-भाग्य-विधाता,
पंजाब-सिंधु गुजरात-मराठा,
द्रविड-उत्कल बंग,
विन्ध्य-हिमाचल-यमुना गंगा,
उच्छल-जलधि-तरंग,
तव शुभ नामे जागे,
तव शुभ आशिष मांगे,
गाहे तव जय गाथा,
जन-गण-मंगल दायक जय हे
भारत-भाग्य-विधाता
जय हे, जय हे, जय हे
जय जय जय जय हे।

हे गाणे बंगाली भाषेत रविंद्रनाथ टागोरांनी लिहिले आणि त्याला चालही त्यांचीच आहे. याच्यापुढे आणखी कडवी आहेत ती अशी –
ओहोरोहो तोबो आशबानो प्रचारितो, शुनि ताबो उदारो बानी
हिंदू बौद्धो शिखो जैनो, परशिको मुशोलमानो ख्रिस्तानी,
पूरबो पश्चिमो आशे, तबो सिंघासनो पाशे
प्रेमोहारो हाव्ये गांथा
जनो गनो ऐक्यो बिधायको जयो हे, भारतो भाग्यो बिधाता
जयो हे, जयो हे, जयो हे
जयो जयो जयो जयो हे

पोतोनो अभ्युदयो बंधुरो पोंथा
जुगो जुगो दाबितो जात्रि
हे चिरो सारोथि, तबो रथ चक्रे, मुखोरितो पोथो दिनो रात्रि
दारुणो बिप्लबो माझे, तबो शंखोध्वोनि बाजे
संकटो दु:खो त्राता
जनो गनो पोथो परिचायको, जयो हे भारतो भाग्यो बिधाता
जयो हे, जयो हे, जयो हे
जयो जयो जयो जयो हे

घोरो तिमिरो घोनो निबिरो, निशिथे पीरितो मुर्छितो देशे
जाग्रतो छिलो तबो अबिछोलो मंगलो, नोतो नयोने अमिषे
दु:स्वप्ने आतंके, रोक्खा कोरिले अंके
स्नेहमोयी तुमि माता
जनो गनो दु:खो त्रयको, जयो हे भारतो भाग्यो बिधाता
जयो हे, जयो हे, जयो हे
जयो जयो जयो जयो हे

रात्रि प्रभितिलो उदिलो रबिछबी, पुर्बो उदयो गिरि भाले
गाहे बिहंगमो पुण्यो समीरणो, नबो जीबनो रशो ढाले
तबो करुणारुणो रागे, निद्रितो भारतो जागे
तबो चोरोणे नोतो माथा
जयो जयो जयो हे, जयो राजेश्वरो, भारतो भाग्यो बिधाता
जयो हे, जयो हे, जयो हे,
जयो जयो जयो जयो हे

Saturday, 11 February 2012

पावनेर ग मायेला करू Pavner ga mayela karu


वाट दवांनं भिजून गेली
उन्हं दारात सोन्याची झाली
मायभवानी पावनी आली
पावनेर ग मायेला करू
ओटी आईची मोत्यानं भरू!
माय अंबिका माय भवानी
रूपदेखणी गुणाची खाणी
शंभूराजाची लाडकी राणी
माझी पायरी लागे उतरू
ओटी आईची मोत्यानं भरू!
सुखी नांदते संसारी बाई
न्हाई मागणं आणिक काई
काळी पोत ही जन्माची देई
तूच सांभाळ आई लेकरू
ओटी आईची मोत्यानं भरू
1967 सालचे सर्वोत्तम मराठी चित्रपट हे राष्ट्रीय पारितोषक पटकावणार्‍या ‘पवना काठचा धोंडी’ या चित्रपटातील हे गाणे आहे. याच चित्रपटातील ‘काय बाई सांगू कसं ग सांगू’ हे गाणं उषा मंगेशकर यांनी गायिले आहे.

चित्रपट पवना काठचा धोंडी, वर्ष 1966, गीतकार शांता शेळके, संगीत हृदयनाथ मंगेशकर, दिग्दर्शक अनंत ठाकूर.

Friday, 10 February 2012

राजा को रानी से प्यार हो गया Raja ko rani se pyar ho gaya


राजा को रानी से प्यार हो गया, पहली नजर में पहला प्यार हो गया

‘अकेले हम अकेले तुम’ या चित्रपटातील हे गाणं आहे. 1979 सालच्या ऑस्कर विजेत्या ‘क्रॅमर व्हर्सेस क्रॅमर’ या चित्रपटाच्या कथेवर आधारलेला हा चित्रपट आहे. गाण्याचे फोरग्राउंडिंग ठेक्याने होते. यावेळी काळ्या बॅग्राउंडवर आमीर खान आणि मनिषा कोइराला यांचा क्लोजअप आहे. प्रकाशयोजनेमुळे दोघे उजळून निघाले आहेत. त्यांच्यातील संबंध कसा आहे हे दाखवले आहे. सूर येतात त्यावेळेस सगळे लाँग शॉट वापरले आहेत. कॅमेरा पॅन होतो, झूम होतो आणि केंद्रस्थानी ती दोघे लाँग शॉटच्या मध्यावर असतात. गाणे सुरू होते त्यावेळेस मिडशॉट येतो आणि ध्रुवपद संपते तेव्हा मिडक्लोज अप येतो. त्यानंतर शिट्या इत्यादींचा वापर करून अतिशय प्रसन्न वातावरण निर्माण केले आहे. दोघांचे चेहरे सतत हसरे आहेत. विविध प्रकारची वाद्ये या गाण्यात वापरली आहेत आणि त्यांचा सुरेलपणा कायम आहे. रोमँटिक वातावरण या संपूर्ण गाण्यात जाणवते. त्यात इरॉटिसिझमची केवळ झलक आहे. सगळे गाणे, संगीत, शब्द आणि शॉट हे ‘प्रेम’ ही संकल्पना सादर करतात.  


चित्रपट अकेले हम अकेले तुम, वर्ष 1995, संगीत अनु मलिक, गीतकार मजरूह सुल्तानपुरी, गायक उदित नारायण आणि अल्का याज्ञिक, दिग्दर्शक मंसूर खान.  

Friday, 3 February 2012

युगा मागुनि चालली रे युगे ही Yuga maguni chalali re yuge hi


युगा मागुनि चालली रे युगे ही
करावी किती भास्करा वंचना
किती वेळ कक्षेत धावू तुझ्या मी
कितीदा करू प्रितीची याचना
न जाणे ना नेणे कुठे चालले मी
कळे तू पुढे आणि मी मागुती
दिमाखात सारे नटोनी थटोनी
शिरी टाकिती दिव्य उल्काफुले
नको क्षुद्र शृंगार तो दुर्बलांचा
तुझी दुरता त्याहुनि साहवे
गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे
मिळोनी गळा घालूनिया गळा
तुझ्या लाल ओठातली आग प्यावी
मीठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा ...
हे पृथ्वीचे प्रेम गीत आहे. कौशल इनामदारने याला चाल लावली आहे. सुर्यावर प्रेम करणारी, त्याच्या भोवती फिरणारी पृथ्वी हे गाणे म्हणते आहे.

Tuesday, 24 January 2012

पाँव में डोरी, डोरी में घुंगरू Paon mein dori

पाँव में डोरी, डोरी में घुंगरू

एका डोंगर माथ्यावर किंवा पठारावर हे गाणे शूट केले आहे. सुरुवातीलाच पहाडी लोकेशन, पहाडी बाजाची स्वर रचना आणि त्यानंतर ठेका, चाल इत्यादींतून गाणे त्याच फोरग्राउडिंगला समर्पक आहे. शशी कपूर आणि मुमताज या गाण्यात आहेत. गाण्यात बैलगाडी फ्रेममध्ये वापरली आहे. पार्श्वभूमिवर सतत डोंगर आहेत. दोन प्रेमी मजेत आहेत असे एकूण वातावरण आहे. ख़ूप वारा आहे ज्याचा उपयोग चित्रीकरण करताना आणि नाच करताना केला आहे.
चित्रपट चोर मचाए शोर, वर्ष 1974, संगीत रवींद्र जैन, दिग्दर्शक अशोक रॉय, गीतकार गुलझार

Monday, 23 January 2012

सखी मोरी रुम झूम Sakhi mori rum jhum


सखी मोरी रुम झूम।
बादल गरजे बरसे ॥
रैन अन्धेरी कालि,
बिजली जमके।
कैसे जाऊँ मैं जल भरन॥

दुर्गा रागात बद्ध ही बंदिश आहे. कोणी रचली कोणास ठाऊक. गाणे शिकायला लागले की दुर्गा हा राग भूप, खमाज, वृंदावनी सारंग, काफी इत्यादी रागांसोबत शिकवला जातो. ओडव ओडव राग आहे हा. म्हणजे यात केवळ पाच स्वर आहेत. आरोहात सा रे म प ध-सां आणि अवरोधात सांधपमरे-सा. याचा वादी स्वर म्हणजे ‘दाखवायचा’ स्वर ‘म’ आहे आणि त्याखालोखालचा स्वर आहे ‘सा’. या रागात रेधसा, मरेप, मपध-म-रेसा, रेपमध-पधसां, धम-रेसा, धम-पधम-रेसा असे स्वर बांधले जातात ज्यामुळे हा राग ओळखता येतो. बंदिश ही शब्दांची रचना म्हणजेच काव्य असले तरी ती गातांना रागाची वैशिष्ट्ये, महत्त्वाचे स्वर आणि रागातील वैशिष्ट्यपूर्ण स्वर रचना दाखवणे अभिप्रेत असते. याच रागातील ‘रसखान रे’ अशी एक बंदिश पंडित भीमसेन जोशी यांनी गायिली आहे आणि ती प्रसिद्ध आहे. मला अगोदर वाटायचे की हे शब्द ‘रस कान्ह रे’ असे आहेत आणि तसे वाटून मी ही बंदिश चक्क कृष्णजन्मात कीर्तनात गायलो. रसखान हा थोर कृष्णभक्त होऊन गेला. तो वैष्णवभक्ती करायचा आणि त्याने अनेक भजने आणि बंदिशी लिहिल्या आहेत. भारतीय संस्कृती कोशात याचे संदर्भ दिले आहेत.
सखी मोरी रुम झूम ही बंदिश गाताना अडखळायला होते ते रैन अन्धेरीच्या वेळी. ही बंदिश बांधली आहे झपतालात. गाताना रैन अन्धेरी नंतर मींड घेतली जाते. म – ध – पध – सां – रेध सां – या शेवटच्या सां वर री ओढली जाते आणि थांबल्यासारखे होते. यामुळे बंदिशीतल्या शब्दांचा अर्थ स्पष्ट होत नाही कारण बंदिश अशी सांगितली जाते – रैन अन्धेरी>>>> कालि बिजली जमके>>>>>. याचा अर्थ बोध होत नाही. त्यामुळे बरेच गायक जमके ऐवजी ‘चमके’ वापरतात. असे केल्याने कालि बिजली चमके>>>> मग ‘कैसे जाऊँ मैं जल भरन’ हे योग्य वाटते. मात्र बिजली काली कशी आणि चमकल्यावर ती काली कशी हे कळत नाही. रैन अन्धेरी काली, बिजली जमके – येथे जमकेवर ठहराव पाहिजे कारण फोरग्राउडिंग येथे संपते. मला वाटते ही चढत्या आवेशाची बंदिश आहे. सखी मोरी --- येथे फोड हवी. नाहीतर सखी – मोरी रुम झूम असे होते ज्याला काहीच अर्थ नाही. सखी मोरे, रुम झूम. रुम झूम कशी? बादल गरजे, बरसे॥ हा सगळा एकूण माहोल झाला. आता त्याचे अधिक स्पष्ट वर्णन – रैन अन्धेरी काली त्यामुळे दिसत नाहिए आणि बिजले जमके – जोरदार वीज चमके आहे. आता प्रश्न पडला आहे कैसे जाऊँ मैं जल भरन. ही शेवटची ओळ जरा खटकते. जल भरन? इतक्या रात्री कशाला जल भरन? की याच्या मागे काही हेतू आहे – पी मीलन?