हमने देखी है उन आँखों की महकती खुशबू, हाथ से छू के इसे रिश्तों का इल्जाम ना दो
सिर्फ एहसास है ये, रूह से मेहसूस करो, प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम ना दो ॥
प्यार कोई बोल नहीं, प्यार आवाज नहीं, एक खामोशी है, सुनती है कहा करती है
न यह बुझती है, ना रुकती है, ना ठहरी है कहीं, नूर की बूँद है, सदियों से बहा करती है ॥1॥
मुस्कुराहट से खिली रहती है, आँखों में कहीं, और पलकों पे उजाले से रुके रहते हैं,
होंठ कुछ केहते नहीं, काँपते होठों पे मगर, कितने खामोश से अफसाने रुके रहते हैं॥2॥
गुलजारचे वरील गीतातील शब्द आणि खाली दिलेल्या गीताचे शब्द त्यांची शैली आणि चिन्हप्रयोगांबाबत खूप माहिती देतात. हमने देखी (पाहणे) है उन आंखों की महकती खुशबू (वास घेणे) – कर्मेंद्रियांना वेगळाच अर्थ येथे प्राप्त होतो. खुशबू ‘पाहणे’? प्यार बोल नहीं म्हणजे नि:शब्द आहे, आवाज नहीं मात्र एक खामोशी है जो सुनती है आणि कहा करती है. न बुझती है, रुकती है, ना ठहरी है कहीं और बहा करती है तरी ही प्यार एक बूँद है नूर की – नूर म्हणजे दवबिंदू.
हे गाणं दोन भागात आहे. पहिल्या भागात वहिदा रेहमान आणि राजेश खन्ना आहेत आणि ते एका इस्पितळात आहेत. गाणं एका रेकॉर्डरवर ऐकले जाते आहे आणि त्या दोघांवर त्या गाण्याचा परिणाम होतो आहे. त्यातच वहिदा रेहमानला गाण्याचा परिणाम राजेश खन्नावर काय होतो हे पाहायचे आहे. गाणे पहिल्या कडव्यानंतर थांबते आणि रेकॉर्डचे खरखर सुरू होते. त्यावरून मग आपण एका स्टुडियोत जातो जेथे दुसरे एक स्त्री पात्र तेच गाणं रेकॉर्ड करते आहे. या गाण्यात कृष्ण धवल रंगांचा आणि लायटिंगचा उपयोग पाहण्यासारखा आहे. त्याचबरोबर कॅमेरा दोन्ही भागात ज्या प्रकारे वापरला आहे ते अभ्यासण्याजोगे आहे. पहिल्या भागात कॅमेरा खालून वरती पाहतो किंवा आपल्या नजरेला समांतर पाहतो. दुसर्या भागात कॅमेरा पात्राकडे वरून पाहतो. त्यामुळे दोन वेगळे डायजेसिक निर्माण होतात.
सुरमई शाम इस तरह आये, साँस लेते हैं, जिस तरह साये
कोइ आहट नहीं, बदन की कहीं, फिर भी लगता है, तू यही है कहीं,
वक्त जाता सुनाई देता है, तेरा साया दिखाई देता है
जैसे खुशबू नजर से छू जाए
दिन का जो भी पहर गुजरता है, कोइ एहसान सा उतरता है,
वक्त के पाँव देखता हूँ मैं, रोज ये छाँव देखता हूँ मैं
आये जैसे कोई ख़याल आये
चित्रपट खामोशी, वर्ष 1969, दिग्दर्शक असित सेन, संगीत हेमंत कुमार, गीतकार गुलजार
No comments:
Post a Comment