Saturday, 11 February 2012

पावनेर ग मायेला करू Pavner ga mayela karu


वाट दवांनं भिजून गेली
उन्हं दारात सोन्याची झाली
मायभवानी पावनी आली
पावनेर ग मायेला करू
ओटी आईची मोत्यानं भरू!
माय अंबिका माय भवानी
रूपदेखणी गुणाची खाणी
शंभूराजाची लाडकी राणी
माझी पायरी लागे उतरू
ओटी आईची मोत्यानं भरू!
सुखी नांदते संसारी बाई
न्हाई मागणं आणिक काई
काळी पोत ही जन्माची देई
तूच सांभाळ आई लेकरू
ओटी आईची मोत्यानं भरू
1967 सालचे सर्वोत्तम मराठी चित्रपट हे राष्ट्रीय पारितोषक पटकावणार्‍या ‘पवना काठचा धोंडी’ या चित्रपटातील हे गाणे आहे. याच चित्रपटातील ‘काय बाई सांगू कसं ग सांगू’ हे गाणं उषा मंगेशकर यांनी गायिले आहे.

चित्रपट पवना काठचा धोंडी, वर्ष 1966, गीतकार शांता शेळके, संगीत हृदयनाथ मंगेशकर, दिग्दर्शक अनंत ठाकूर.

No comments:

Post a Comment